रोहित कणसे
बऱ्याच जणांना त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर काही लोकांना त्यांचं वजन खूपच कमी असल्याची चिंता असते.
जर तुम्हीही तुमचे वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर आज आपण काही टीप्स जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 40 दिवसात वजन वाढवू शकाल.
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॉम्प्लेक्स शुगर असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते, यासाठी तुम्ही रोज उकडलेल्या बटाटे आहारात घ्यावे लागतील.
तुपामध्यो मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळे रोज तुपाचे सेवन केल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.
वजन वाढवण्यासाठी रोज मूठभर मनुके खा. तुम्ही ते पाण्यात भिजवूनही खाऊ शकता, असे केल्याने तुमचे वजन वेगाने वाढेल.
अंड्यांमध्ये भरपूर फॅट आणि कॅलरीज असतात. याचे रोज सेवन केल्याने देखील तुमचे वजन वाढेल.
जर तुम्ही रोज काही केळींचा आहारात समावेश केला तर तुमचे वजन नक्कीच वाढेल, कारण केळीमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीज असतात.
वजन वाढवण्यासाठीही बदाम खूप फायदेशीर ठरतो, वजन वाढवण्यासाठी 3-4 बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा, यामुळे तुमचे वजन वाढू लागेल.
पीनट बटर हे हाय कॅलरीजचा सोर्स आहे, यामध्ये कार्बोहायड्रेट्स देखील भरपूर असतात त्यामुळे वजन वाढवण्यासाटी याचे सेवन फायदेशीर ठरेल.
दारू पिल्यावर लोक इंग्लिश का बोलतात?