Saisimran Ghashi
काहीही खाल्ल तरी अंगी लागत नाही,वजन वाढत नाही ही अनेकांची समस्या असते.
कमी वजनामुळे कमी रोगप्रतिकारक शक्ती आणि थकवा जाणवू शकतो.
कमी वजनामुळे आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.
अश्यात खाण्यापिण्यात बदल करून तुम्ही वजन वाढवू शकता.
आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत जे रोजच्या जेवणात समाविष्ट केल्याने तुमचं वजन वाढण्यास मदत होईल.
तुम्ही रोज एक चमचा पीनट बटर खाल्ल्याने कॅलरी, प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्समुळे वजन वाढते.
केळ्यामध्ये डाएटरी फायबर, प्रोटीन, विटामिन ए, फोलेट आणि हेल्दी फॅट्स वजन वाढवण्यास मदत करतात.
भात आणि तांदळापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ल्याने देखील वजन वाढते.
बटाटा आणि अन्य स्टार्चयुक्त भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असल्याने त्याने वजन वाढते.
हे उपाय सामान्य माहितीसाठी आहेत.आम्ही याची पुष्टी करत नाही.