सकाळ डिजिटल टीम
शरीराच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. पण पुरेशा झोपेबरोबरच चांगली झोपही गरजेची आहे.
चांगल्या झोपेसाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी हे दोन तीन तास झोपतात हे आपण ऐकलं असेलच. त्यांचा झोपेचा वेळ कमी असला तरी ते चांगली झोप घेणं त्यांच्या फायद्याचं ठरतं.
चांगल्या झोपेसाठी चांगला आहार महत्त्वाचा आहे. यासाठी कोणते घटक आहारात असावेत?
अश्वगंधा - झोपण्याआधी अर्धा तास अश्वगंधाचं सेवन केल्यास चांगली झोप लागू शकते.
बदाम - बदाम आपल्याला गंभीर आजारांपासून वाचवतो. बदामामुळे शरीरातलं झोपेसाठी उपयुक्त असणारं मेलाटोनिन वाढतं आणि स्नायूंनाही आराम मिळतो.
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, ट्रिप्टोफैन असतं. ते मेलाटोनिन तयार करतं, ज्यामुळे शांत झोप लागते.
जायफळ - दुधात जायफळ मिसळून पिल्याने शांत आणि चांगली झोप लागते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.