पुजा बोनकिले
बदलत्या हवामानामुळे खोकला, ताप, पोटदुखी, घसा दुखणे अशा समस्या निर्माण होतात.
हवामानातील बदलामुळे घशाचा संसर्ग होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
बदलत्या हवामानामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
घशाची काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.
उन तापायला लागली की लगेच एसीमध्ये बसू नका. एसीमध्येच नव्हे तर कूलरमध्येही बसू नका. त्यामुळे घशात इन्फेक्शन होऊ लागते. एसीमध्ये गेलात तरी तापमान २५ अंशांच्या आसपास ठेवा.
अनेक वेळा लोक उन्हातून बाहेर पडल्यावर लगेच आंघोळ करतात. असे करू नका. यामुळे सर्दी आणि घसा खवखवतो.
उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स चांगले असतात. पण त्याचा जास्त वापर करू नका. यामुळे घशात जळजळ होऊ शकते.
कफ जास्त असल्यास वाफ घ्यावी. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. 5-7 मिनिटे वाफ घ्या.