Aishwarya Musale
आपल्या घरी अनेक नको असलेले पाहुणे येतात, त्यापैकी एक पाल! या पालीची दहशत इतकी आहे की लोकांना ते पाहणे तर सोडाच, त्याच्या जवळ येणेही आवडत नाही.
घरातले किडे खाऊन पाल माणसाला मदत करते खरी पण तरी अन्नावरून पाल फिरली, पाल जवळ आली, अगदी भिंतीवर जरी दिसली तरी लोकांना नकोच असते.
म्हणूनच लोक अनेकदा त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न करतात. चला तर मग जाणून घेऊयात पालींना घरापासून दूर ठेवण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो.
दर आठवड्याला घराचा कोपरा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. काही लोक स्वयंपाकघर इतके घाणेरडे ठेवतात की त्याला दुर्गंधी येऊ लागते. अन्न उघडे न ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा पाली येतात.
कांदा आणि लसूण मध्ये तीव्र गंध असतो जो पालीच्या इंद्रियांवर हल्ला करतो, त्यांना हानी न पोहोचवता त्यापासून मुक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. पालींना दूर ठेवण्यासाठी कांद्याचे काही तुकडे किंवा लसणाच्या कच्च्या कांड्या घरात ठेवा.
पाली सहसा शिल्लक अन्नाच्या शोधात घरात प्रवेश करतात. त्यामुळे स्वयंपाकघरातील आणि घरातील उरलेले अन्न असेल तर ते लवकरात लवकर फेकून द्या. नंतर जर काही पदार्थ खायचे असतील तर लगेच फ्रीजमध्ये ठेवा.
जर आपण पालीला घाबरत असाल तर आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जिथे हा प्राणी जास्त प्रमाणात आढळतो तिथे पेपर स्प्रे शिंपडा, त्याचा वास पालीला दूर ठेवतो आणि त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यात जळजळही करतो.
पाली आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत, त्यांना उबदार वातावरण आवडते. घरात एसी वापरला तर थंड तापमानात हे जीव जगू शकत नाहीत, ते पळून जातात. हा ही एक चांगला उपाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.