Aishwarya Musale
पावसाळ्याला लवकरच सुरूवात होणार असून या दिवसात वातावरणात आर्द्रता असते. त्यामुळे पायांना येणारा घाम, किंवा पावसाच्या पाण्यामुळे आपल्या चपला, बूटही ओले होतात.
ते लवकर वाळत नाहीत. त्यामुळे दुर्गंध तर येतोच पण त्यामुळे पायाला फंगल इन्फेक्शनही होऊ शकते. तसेच दुर्गंधामुळे बूट घालणेही नकोसे वाटू शकते.
तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर चपलांमधील दुर्गंध घालवण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करू शकता.
बेकिंग सोडा हा मॉयश्चर वेगाने शोषून घेतो. त्याचसोबत तो दुर्गंध कमी करण्यासही मदत करतो. बूट ओले असतील तर त्यात थोडा बेकिंग सोडा शिंपडा व रात्रभर ठेवा.
बुटांमधून वास येत असेल व ते ओले असतील तर कोरडे करण्यासाठी त्यात कागदाचे तुकडे पसरवून ठेवा. त्यामुळे ओलावा शोषला जाईल आणि दुर्गंधही कमी होईल.
बुटांमधून येणारा दुर्गंध काढण्यासाठी त्यात टॅल्कम पावडर फवारा. त्यामुळे दुर्गंध कमी होईल. चपला खूपच ओल्या असतील त्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि उन्हात वाळवा.
चपलांमधून खूप वास येत असेल तर त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळून रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवा.
यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस मरण्यास मदत होईल. सकाळी चपला बाहेर काढा, बुटांचा वास गायब होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.