अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखावी? 'या' टिप्स लक्षात ठेवा

Aishwarya Musale

कांजीवरम साडी

लग्नात किंवा कार्यक्रमात रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही कांजीवरम साडी नक्की वापरुन पाहिली पाहिजे. पण हल्ली ऑनलाइन शॉपिंग करत असताना कांजीवरमच्या नावाखाली कोणतीही साडी देतात.

टिप्स

किंवा कधी कधी दुकानदारही फसवेगिरी करतात. पण खरी कांजीवरम साडी ओळखण्याच्या काही टिप्स आहेत ते जाणून घेऊया. 

100 टक्के शुद्ध रेशम

कांजीवरम साड्या 100 टक्के शुद्ध रेशमापासून बनवल्या जातात. त्यावर विविध प्रकारच्या डिझाइन केल्या जातात. काही साड्यांमध्ये सोन्याची जरीदेखील विणली जाते.

वजन

अस्सल कांजीवरम साडी वजनाने खूपच हलकी असते कारण त्यात सिल्कचा वापर केला जातो. बनावट साड्यांमध्ये मिश्र सिल्कचा वापर केला जातो त्यामुळं त्या वजनाने जड असतात. कांजीवरम साडी घेताना जर ती जड दिसली तर ती खोटी आहे असं मानू शकतो. 

धागा

कांजीवरम साड्यांमध्ये रेशमी धागे वापरले जातात. हे धागे अतिशय बारीक आणि चमकदार असतात. हे धागे मजबूत असतात आणि सहजासहसी तुटत नाहीत. अस्सल कांजीवरम साडी ओळखण्याचा हा उत्तम मार्ग आहे. 

डिझाइन

कांजीवर साड्यांमधील डिझाइन पारंपारिक असते. या साड्यांवरील डिझाइन हाताने विणलेले असते तसंच, भरतकाम केलेले असते. तर, बनावट साड्यांमध्ये सोप्या व मशीनवर बनवलेल्या डिझाइन असतात. 

आतील बाजूस धागे

कांजीवरम साडी ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे पदरावरील व काठाचा साडीचा भाग उलट्या बाजूने तपासा जर पदराच्या उलट्या बाजूला धागे दिसत असतील तर कांजीवरम साडी खरी आहे. 

किंमत

कांजीवरम साड्यांची किंमती खूप जास्त असतात. तर तुम्हाला स्वस्तात ही साडी मिळत असेल तर समजून जा यातील सिल्क मिश्र आहे.   

तुम्हीही ग्लास न धुता एकाच ग्लासातून वारंवार पाणी पिता का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा