अस्सल आंबा कसा ओळखायचा? आरोग्यासाठी कृत्रिमपेक्षा नैसर्गिकरीत्या पिकवलेलाच आंबा बरा

Monika Lonkar –Kumbhar

आंबे

उन्हाळा सुरू झाला की, सर्वांना आस लागते ती आंब्यांची. कारण, याच दिवसांमध्ये फळांचा राजा आंबा हा मार्केटमध्ये विक्रीसाठी येतो.

आजकाल मार्केटमध्ये कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे मोठ्या प्रमाणात दिसतात. शिवाय, हे आंबे आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

बारीक सुरकुत्या

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर बारीक सुरकुत्या पडल्यासारख्या दिसतात.

हिरवट पिवळा

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा दिसायला हिरवट पिवळा असा साधारणतः फिकट रंगाचा असतो.

शिवाय, आंब्याच गर हा पिकलेला असतो.

नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा बोटाने हलका जरी दाबला तरी बोटे त्यात दबतात, तो नरम असतो. सालीवर चट्टे न पडताही हा आंबा बरेच दिवस चांगला राहू शकतो.

असा आंबा रसाळ, गोड चवीला मधुर असतो. आंब्याजवळ जाताच त्याचा घमघमाट येतो. घरभर सुगंध दरवळतो.

केसांमधील गुंता सोडवण्यासाठी सोप्या टिप्स करा फॉलो

Hair Care Tips | esakal
येथे क्लिक करा.