राहुल शेळके
जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही स्टॉकच्या 200 टक्के, 400 टक्के किंवा त्याहून अधिक परताव्याची चर्चा होते, तेव्हा बरेच लोक त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.
अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती?
गुंतवणुकीवर चांगला नफा मिळविण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक कसे ओळखावे.
एक नियम आहे ज्याचे पालन करून तुम्ही हे समजू शकता की स्टॉक तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न देईल की नाही.
भारतीय-अमेरिकन गुंतवणूकदार मोहनीश पाबराई, ज्यांनी वॉरेन बफेच्या गुंतवणुकीचा मार्ग अवलंबून प्रचंड पैसा कमावला.
त्यांनी सांगितले की कोणत्याही गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य शेअर ओळखणे.
जर तुम्ही योग्य स्टॉक ओळखला तर तुम्हाला परतावा नक्कीच मिळेल. 26 च्या सूत्राचा वापर करून तुम्ही योग्य स्टॉक ओळखू शकता.
यामध्ये तुम्हाला हे पहावे लागेल की ज्या कंपनीचा स्टॉक 26 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा देत आहे तो तुमच्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक सिद्ध होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करा.