Aishwarya Musale
वाढते वजन ही आजकाल वयाची समस्या आहे. त्याचबरोबर एकदा पोट आणि कमरेची चरबी वाढली की ती कमी करणे खूप अवघड ठरत आहे, पण आता घाबरून जाण्याची गरज नाही.
एखादे विशिष्ट पेय प्यायल्याने तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता आणि हे पेय तयार करणे देखील खूप सोपे आहे.
पोटाची चरबी कमी करणं इतकं सोपं नसतं, पण घरात असलेल्या जिऱ्याचा वापर केल्यास ही समस्या सहज दूर होऊ शकते.
त्याचबरोबर वाढते वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. हे शरीरातील चरबीविरूद्ध प्रभावीपणे कार्य करते.
जिरे हा एक असा मसाला आहे ज्याशिवाय अनेक भारतीय पाककृतींची चव फिकी पडते, ते खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय पचनक्रियाही योग्य होते
जिरे पेय तयार करण्यासाठी २ चमचे जिरे घेऊन एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवावे.
भिजवताना पाणी उकळून घ्या आणि नंतर थंड झाल्यावर सुती कापडाने गाळून घ्या. शेवटी या पेयात लिंबाचा रस घालून प्यावे.
2-2 आठवडे नियमित हे पेय प्यायल्यास त्याचा परिणाम दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.