'रोज डे'ला मिळाले भरपूर गुलाब? घरीच असा बनवा गुलकंद

Sudesh

'रोज डे'

व्हॅलेंटाईन्स वीकमधील पहिला दिवस हा 'रोज डे' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जवळच्या व्यक्तींना गुलाब दिले जातात.

Gulkand Recipe | eSakal

गुलकंद

तुमच्याकडेही भरपूर गुलाब जमा झाले असतील, तर तुम्ही ते टाकून देण्याऐवजी घरच्या घरी गुलकंद तयार करू शकता.

Gulkand Recipe | eSakal

फायदे

गुलकंद तयार करण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. हे चवदार आणि आरोग्यदायी असतं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.

Gulkand Recipe | eSakal

साहित्य

गुलकंद तयार करण्यासाठी गुलाबाच्या ताज्या पाकळ्या, साखर, बडीशेप, वेलची पावडर आमि मध एवढंच साहित्य गरजेचं आहे.

Gulkand Recipe | eSakal

कृती

सगळ्यात आधी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या तोडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या पाकळ्या वाळल्यानंतर त्या साखरेसोबत एका भांड्यात मॅश करुन घ्या.

Gulkand Recipe | eSakal

कृती

यानंतर एका कढईमध्ये साखर आणि गुलाबाचं हे मिश्रण घेऊन, 2-3 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या.

Gulkand Recipe | eSakal

कृती

यानंतर यामध्ये एक टी-स्पून बडीशेप आणि थोडीशी वेलची पूड मिक्स करून घ्या. हे मिश्रणही 2-3 मिनिटे शिजवा.

Gulkand Recipe | eSakal

कृती

यानंतर या मिश्रणात एक चमचा मध मिक्स करा. तुमचं गुलकंद तयार असेल. हे थंड झाल्यावर काचेच्या जारमध्ये साठवून ठेवा.

Gulkand Recipe | eSakal

प्रेमाचंं प्रतीक असतं गुलाब, मात्र प्रत्येक रंगाचा आहे वेगळा अर्थ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rose | Sakal
येथे क्लिक करा