साक्षी राऊत
शाम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावल्याने केस मऊ होतात. मात्र त्यात अनेक केमिकल्ससुद्धा असतात. तेव्हा केसांना नॅचरल कंडिशनर लावा. ते बनवण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा.
एक लहान बटाट बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यात थोजे पाणी मिसळून केसांना लावा. आता ही पेस्ट ३० मिनिटांपर्यंत ठेवा आणि मग केस धुवून घ्या. बटाट केसांना चमकदार बनवण्यास मदत करेल.
अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइलमध्ये अॅलोव्हेरा जेल मिसळून केसांना लावा. काही वेळ ठेवल्यानंतर केसांना व्यवस्थित धुवून घ्या. त्यामुळे केसांना मऊपणा येईल सोबतच पोषणही मिळेल.
लिंबाचा रस केसांना लावल्याने केस हेल्दी होण्यास मदत होईल. गुलाब जलमध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावा. दहा मिनिटे केस तसेच ठेवा आणि मग धुवून घ्या.
अँटिऑक्सिडंट्सयुक्त तुळशीच्या पानांची पेस्ट शाम्पूनंतर केसांना लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्या. या उपायाने तुम्ही केस मुलायम आणि हायड्रेटेड ठेवू शकता.
अॅलोव्हेराच्या आतील जेल केसांना लावून २०-३० मिनिट ठेवा. नंतर हेअर वॉश करा. अॅलोव्हेरा जेल तुमच्या केसांना हायड्रेटेड आणि शायनी बनवेल.
वरील वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही नॅचरल हेअर कंडिशनर बनवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.