Saisimran Ghashi
खूप जास्त चिंता वाटणं किंवा अचानक घाबरणं म्हणजेच Anxietyचा अटॅकची समस्या वाढत चालली आहे. पण अशा परिस्थितींमध्ये शांत कसं राहायचं, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
आम्ही तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुमचे मानसिक आरोग्य शांत आणि आणि एंग्जायटी दूर होईल.
४ सेकंद श्वास आत घ्या, ७ सेकंद थांबा आणि ८ सेकंद श्वास बाहेर टाका. या पद्धतीने हळूहळू श्वास घेणं फायदेशीर ठरते.
उलटे आकडे मोजा.जवळपासच्या ५ गोष्टी पहा, ४ आवाज ऐका, ३ गोष्टी स्पर्श करा, २ वास ओळखा आणि १ चव चाखता येणारी गोष्ट नोंदवा. असे केल्याने तुमचे लक्ष बाहेरच्या गोष्टींकडे जाईल.
लेवेंडरच्या फुलांचा किंवा तेलाचा सुगंध किमान ३ मिनिटे घ्या. यामुळे एंग्जायटी दूर होऊन टेंशन कमी झाल्यासारखे वाटते.
"ही वेळ सुद्धा निघून जाईल" असा मंत्र जप करत रहा. भीती आपोआप काही मिनिटांनी कमी होऊ लागते.
आधीही अशी परिस्थिती झेलली आहे, आणि थोडी शांतता राखली तर पुन्हा सगळे ठीक होईल, हे आठवा.
अश्या काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही मानसिक आरोग्य चांगले ठेऊ शकता आणि एंग्जायटी,चिंता दूर करू शकता.