पुजा बोनकिले
अनेकवेळा लहान मुले विचित्र वागतात.
मुलांचे असे का वागतात हे पालकांना कळत नाही.
मुलांच्या विचित्र वागण्यामागे तणाव असू शकतो. लहान मुलांमध्ये ताणाव वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात तज्ज्ञांकडून हे जाणून घेऊया.
लहान मुले तणावाला सामोरे जात असेल तर छोट्या गोष्टींना देखील विरोध करत असतात.
लहान मुलांमध्ये तणाव वाढल्यास चिडचिडेपणा वाढतो. हे एक सामान्य लक्षण आहे.
झोपायला समस्या येत असलेले मुले तणावाला सामोरे जात असतात.
तणावात असलेले मुले नेहमी इतरांपासून दूर राहतात आणि एकटे राहतात.
तणावातून जाणारे मुले शाळेत देखील संघर्ष करत असतात. शाळेतील वागणूकीत बदल दिसून येतो.
मुलांना तणाव जास्त असेल तर वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो.