सकाळ डिजिटल टीम
आजकाल पोट वाढणे ही अनेकांची समस्या बनली आहे. बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होते.
त्यामुळे वजन वाढते आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. आज जगभरात लाखो लोक वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त आहेत.
जर तुमचे पोटही वाढलेले असेल आणि तुम्हाला कमी करायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून 15 दिवसांत फायदे मिळवू शकता.
बेली फॅट कमी करण्यासाठी पिवळा मोठा हिरडा अत्यंत गुणकारी आहे.
केवळ 15 दिवस वापरून आपण आपली कंबर 2 ते 3 इंच आणि तेवढेच किलो वजन कमी करू शकता.
पिवळ्या मोठ्या हिरड्याची पावडर घ्या, पावडर नसेल तर तो किसून त्याचे चूर्णही बनवू शकता. अर्था चमचा पावडर एक ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि अनोशेपोटी घ्या.
हिरडा हे पोटासाठी अत्यंत चांगले फळ आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
नियमितपणे हिरड्याचे सेवन केल्यास, ॲसिडिटीची समस्याही दूर होते.