Saisimran Ghashi
आपले डोळे,आपला चेहरा नेहमी सुंदर आणि ताजातवाना दिसावा यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असते.
पण कधी कधी अति विचार, चिंता, झोप पूर्ण न होणे किंवा अनुवंशिकपणे डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्स निर्माण होतात.
या डार्क सर्कल्स मुळे नक्कीच चेहऱ्याचा उजळपणा कमी होतो आणि चेहरा विचित्र दिसू लागतो.
या डार्क सर्कल्सवर असा घरगुती उपाय आहे ज्याने आठवडाभरातच ते गायब होतील आणि चेहरा पूर्वीसारखा सुंदर दिसेल.
तुम्हाला डार्क सर्कल्स का येत आहेत या मागचे कारण जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाच्या घरी कोरफडचे झाड असतेच किंवा आपल्या आजूबाजू शेजारी कोरफड असल्यास उत्तम किंवा बाजारतून विकत आणू शकता.
ताज्या कोरफड मध्ये विटामिन-ई ची एक गोळी (कॅप्सुल) फोडून एकत्र मिक्स करून घ्या.
हे मिश्रण मिक्स करत असताना त्याच्यातून पांढऱ्या रंगाचा लेप तयार होत नाही तोपर्यंत मिक्स करत रहा.
लेप तयार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यांच्या भोवतीने सर्कलवर आणि हवे असल्यास चेहऱ्यावर देखील लावू शकता.
हा उपाय सतत आठवडाभर केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल.डोळ्याखालची काळी वर्तुळे पुसट होताना दिसू लागतील.