पुजा बोनकिले
तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर पुढील गोष्टी करू शकता.
हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
खजुर खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघते.
हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी केळी खावे.
बीटमध्ये भरपुर पोषक घटक असतात. यामुळे बीटचे रोजच्या आहारात समावेश करावा.
डाळिंबामध्ये प्रोटिन, व्हिटॅमिन, फायबर यासारखे घटक असतात.
आपल्या आहारात बदल झाल्यास किंवा पोषक घटकांची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनची कमतरता जाणवू शकते.
शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे वेळीच काळजी घ्यावी.