Saisimran Ghashi
आजकालच्या धावपळीच्या जीवनात ऑनलाइन पेमेंट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
पण यासोबतच आपल्या बँक खात्याची सुरक्षा राखणेही गरजेचे आहे.यातच महत्वाची भूमिका बजावते UPI PIN.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तुमचा UPI PIN वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे.
काही सोप्या स्टेप्ससह BHIM UPI अॅप वापरून तुम्ही अगदी सहजपणे तुमचा UPI PIN बदलू शकता.
BHIM UPI अॅप उघडा. मेनूमधून "Bank Account" निवडा.
"Reset UPI PIN" शोधा आणि निवडा.
तुमच्या डेबिट कार्डाचा शेवटचा सहा अंकी क्रमांक आणि expiry date टाका.
तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळेल.
OTP स्वयंचलितपणे टाकले जाईल.
नवीन UPI PIN टाका आणि पुष्टी करा.तुमचा नवीन पिन सेट होईल.
या सोप्या स्टेप्सनी Google Pay, PhonePe, Paytm सारख्या इतर डिजिटल पेमेंट ॲप्सचे पिन देखील बदलू शकता.