रोहित कणसे
ऋतूंच्या बदलांचा आपल्या केसांवर लगेच परिणाम झाल्याचे पाहयला मिळते, पावसाळ्यात अनेकांना गेस गळण्याच्य समस्येला सामोरे जावे लागते.
आज आपण पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या काही टीप्स जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात आपण केस वारंवार धुणे टाळले पाहिजे, यामुळे तुमची स्कॅल्प ओली राहाते आणि यामुळे तुमचे केस गळू शकतात.
जर तुम्ही पावसात भिजलात तर घरी पोहचल्याबरोबर केस शॅम्पूने धुवावेत, कारण पावसाच्या पाण्यामुळे देखील केसगळती होऊ शकते.
केस मजबूत व्हावेत यासाठी हेअर मसाज खूप आवश्यक आहे, त्यामुळे केसांना शॅम्पू करण्यापूर्वी ४० ते ३० मिनीट अधी तुम्ही हेअर ऑइलने चांगली मसाज घ्या.
तुमचे केस खूप कोरडे आणि डल होऊ नयेत म्हणून हेअर मास्क जरूर लावा, बाजारात असंख्य हेअर मास्क तुम्हाला मिळून जातील. तसेच शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर नक्की वापरा.
मान्सूनमध्ये आठवड्यात एक दिवस केस धुण्याआधी पात मिनीटे स्कॅल्पवर कोरफड देखील लावू शकता, याने डोक्यात डँड्रफ होत नाही, तसेच केसगळणे देखील कमी होते.
पावसाळ्यात ओले केस घेऊन बाहेर फिरू नका. असे केल्याने ओल्या केसांमध्ये धूळ आणि प्रदुषण खूप प्रभावित करते, यामुळे केस गळू शकतात.
नेहा पेंडसे सध्या काय करतेय?