उन्हाळ्यात ग्लोईंग त्वचेसाठी तुळशीचा असा करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

त्वचा

त्वचा सुंंदर आणि ग्लोईंग दिसावी, यासाठी तरूणी त्वचेची खास काळजी घेतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी मग अनेक स्किनकेअर उत्पादनांचा वापर केला जातो.

तुळस

महागड्या स्किनकेअर उत्पादनांपेक्षा तुम्ही त्वचेसाठी तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.

ब्लॅकहेड्स

ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने वाटून घ्या, त्यात मध मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवा.

पिंपल्स

तुळशीची पाने वाटून घ्या, त्यात चिमूटभर हळद मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा २० मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे, पिंपल्स दूर होण्यास मदत होईल.

डागांची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने वाटून घ्या. त्यात मध आणि गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे, डाग दूर होण्यास मदत होईल.

तुळशीची पाने वाटून घेतल्यानंतर त्यात हळद, बेसनपीठ आणि कच्चे दूध मिसळा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर तुमचा चेहरा उजळण्यास मदत होईल.

अवकाळी पावसात आरोग्याची घ्या खास काळजी

Health Care | esakal
येथे क्लिक करा.