युगंधर ताजणे
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी ही आता चर्चेत आली आहे. त्याचे कारण काही वेगळे आहे.
गँग्स ऑफ वासेपूरमधून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या हुमानं ओटीटीवरही दमदार पदार्पण केलं आहे.
हुमा ही इंस्टावर देखील व्हायरल असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.
आता हुमा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या गोष्टीवरुन चर्चेत आल्याचे दिसून आले आहे.
हुमाबाबत असे बोलले जाते की, ती गेल्या वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र तिनं त्याविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही.
असं म्हटलं जातंय की, हुमा आणि अॅक्टिंग कोच रचित सिंह हे एकमेकांना डेट करत आहे. त्यावर दोघांकडून कोणताही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
यापूर्वी हुमाचे नाव हे अर्जुन बाजवा, शाहिद कपूर, दिग्दर्शक अनुराग कश्यप, सोहेल खान आणि अभिषेक चौबेसोबत जोडले गेले होते.
सध्या हुमाची महारानी नावाची वेबसीरिज चर्चेत आहे. त्या सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.