मुघल बादशहाने राणी कर्नावतीच्या राखीची राखली होती लाज!

कार्तिक पुजारी

राणी कर्नावती

रक्षाबंधनाचा उत्सव ३० तारखेला साजरा केला जात आहे. यादिवशी राणी कर्नावतीचा उल्लेख नक्की होतो.

आक्रमण

तत्कालीन गुजरातचा शासक बहादुर शाहने चित्तौडच्या नाराज सामंतांच्या सांगण्यावरुन चित्तौडवर आक्रमण केले होते

राखी पाठवली

बहादुर शाहच्या या आक्रमणापासून वाचण्यासाठी राणा सांगाची पत्नी राणी कर्नावतीने हुमायू यांना राखी पाठवली होती

संदेश पाठवला

राणी कर्नावतीने राखी पाठवण्यासोबतच एक संदेश पाठवला होता. या संदेशमध्ये कर्नावतीने हुमायूला राज्याचे रक्षण करण्याची विनंती केली होती.

युद्धात अडकला

राणीच्या या विनंतीमुळे हुमायूचे मन पिघळले. पण, त्यावेळी हुमायू ग्वालियरच्या युद्धात अडकला होता. त्यामुळे त्याला संदेश मिळायला उशीर झाला

बहादुरशहा जिंकला

हुमायूचे सैन्य जोपर्यंत मेवाड येथे पोहोचले, तोपर्यंत बहादुरशहा जिंकला होता. राणी कर्नावतीने स्वत:ला आगीच्या स्वाधिन केलं होतं.

पुत्र विक्रमजीत

पण, हुमायूच्या सैन्याने चित्तोडमधून जफर शहाच्या सैन्याला हकाललं आणि राणीचा पुत्र विक्रमजीत याला गादीवर बसवून राखीचा मान ठेवला होता

तेव्हापासून आतापर्यंत रक्षाबंधनाच्या दिवशी या ऐतिहासिक घटनेची आठवण काढली जाते. असे असले तरी अनेकजण या कथेच्या सत्यतेबाबत शंका घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

humayun rani karnavati