साक्षी राऊत
देशभरात चर्चित आणि सुंदर टीना डाबी राजस्थान कॅडरची IAS ऑफिसर आहे. 2022 मध्ये तिने IAS प्रदीप गावंडेसह लग्न केलं. आता लग्नाच्या एका वर्षानंतर टीना सप्टेंबर महिन्यात पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
टीना डाबीने राज्य सरकारला पत्र लिहत जेव्हा मॅटर्निटी लिव्ह्ज मागितल्यात तेव्हा तिच्या प्रेग्नेंट असल्याची माहिती सर्वत्र पसरली. तिच्या प्रेग्नेंसीची बातमी पुढे येताच लोक प्रदीप गांवडेचे वय सर्च करू लागले. Tina Dabi
टीना डाबीचे पती तिच्यापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. ज्याप्रमाणे महिलांच्या वाढत्या वयाचा त्यांच्या प्रेग्नंसीवर प्रभाव पडतो त्याप्रमाणेच पतीच्या वयाचासुद्धा प्रेग्नंसीवर प्रभाव पडतो का ते जाणून घेऊया.
डॉक्टरांच्या मते, ज्याप्रमाणे वाढत्या वयात महिलांची फर्टिलीटी कमी होते त्याचप्रमाणे पुरुषांच्या वाढत्या वयात त्यांची स्पर्म कॉलिटी आणि काँटीटीवर प्रभाव पडतो.
एक्सपर्ट्सच्या मते, पुरुषांमध्ये स्पर्म प्रोडक्शन कधीच थांबत नाही. मात्र वाढत्या वयानुसार स्पर्मचा डीएनए डॅमेज होण्याचा धोका वाढतो. ज्याचा प्रभाव प्रजनन क्षमतेवर होतो.
ट्रांसलेशन सायकेट्रीमध्ये प्रकाशित एका स्टडीमध्ये वाढत्या वयात वडील झाल्यास बाळाच्या मेंदूच्या स्तरावर प्रभाव पडतो. अशात बाळाला तंत्रज्ञानातील विकासासंबंधी विकाराची शक्यता वाढते.
२०१२ च्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या एका अभ्यासात असे दिसून आले की वडीलांच्या वयाचा आणि क्रोमोझोम्सचा जवळचा संबंध असतो. ज्यामुळे बाळ दीर्घायुषी होतं.
तर कॅलिफोर्नियाच्या एका स्टडीनुसार मुलांच्या पालनपोषणासाठी वडीलांच्या योग्य वयाचा अंदाज लावण्यात आला. त्यात असे दिसून आले की जास्त वय असलेले वडील त्यांच्या मुलांना इमोशनली चांगले प्रीपेअर्ड करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.