अनिरुद्ध संकपाळ
वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत संयुक्तपणे सुरू असलेल्या या विश्वकरंडक स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम आज आयसीसीने जाहीर केली.
ही एकूण बक्षीस रक्कम ११.२५ दशलक्ष डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांत ही रक्कम ९३ कोटी ५४ लाख ६९ हजार अशी आहे.
विजेत्या संघाला २.४५ दशलक्ष डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये २० कोटी ३६ लाख ६२ हजार इतकी आहे.
उपविजेता संघ १.२८ दशलक्ष डॉलरचा म्हणजेच १० कोटी ६४ लाख २० हजार रुपयांचा मानकरी ठरेल.
उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना प्रत्येकी ७ लाख ८७ हजार ५०० डॉलर देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत २० देशांचे संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघाला म्हणजेच २० व्या क्रमांकावर राहणाऱ्या संघालाही बक्षीस मिळणार आहे.
सुपर-८ मध्ये स्थान मिळवणारा प्रत्येक संघ ३ लाख ८२ हजार ५०० डॉलरचा मानकरी ठरेल. १३ ते २० या क्रमांकावरील प्रत्येक संघाला २ लाख २५ हजार डॉलर मिळतील.
उपांत्य आणि अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला अतिरिक्त ३१ हजार १५४ डॉलर मिळणार आहेत. २८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५५ सामने होणार आहेत.