चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाककडून जाणार?

Kiran Mahanavar

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे.

1996 नंतर कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन करण्याच्या तयारीत पाकिस्तान व्यस्त आहे. पाकिस्तान सरकार आपल्या स्टेडियम, हॉटेल्स आणि इतर संसाधनांवर करोडो रुपये खर्च करत आहे.

दरम्यान, एक मोठे अपडेट समोर येत आहे. असे झाल्यास पाकिस्तानच्या आशांना मोठा धक्का बसेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत आयसीसीची परिषद सुरू आहे. या परिषदेतच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते.

भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

जर भारतीय संघ पाकिस्तानला गेला नाही तर आयसीसी ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी दुबई किंवा श्रीलंकेत आयोजित करू शकते.

यामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट दक्षिण आफ्रिका, क्रिकेट इंग्लंड देखील भारताला पाठिंबा देणार आहेत.

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना भारताकडून किती रुपयांचं मिळणार बक्षीस?

Neeraj Chopra | Sakal
येथे क्लिक करा