आईस टी पिणे आरोग्यासाठी चांगलं की वाईट, फायदे-तोटे काय?

Aishwarya Musale

आईस टी

आईस टी फक्त शरीराला थंडावा देत नाही तर ती प्यायल्याने आपल्या आरोग्यास बरेच फायदे होतात. सामान्यपणे आईस टी ब्लॅक किंवा ग्रीन टी पासून तयार केली जाते. आईस टीमध्ये पोटॅशिअम,  फायबर, मॅग्नेशिअम, यांसारखे अँटिऑक्सिडंट्स पोषक तत्त्व असतात. 

रोग प्रतिकारशक्ती वाढते

आईस टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात जे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे शरीराचे संसर्गापासून संरक्षण होते

हृदयाचे आरोग्य

आईस टी च्या सेवनाने हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. आईस टीमध्ये असलेलं फ्लेव्होनॉइड रक्तवाहिन्यातील सूज कमी करते, त्यामुळे हृदयासंबंधी होणाऱ्या आजारांपासून आपले संरक्षण होते.

शरीर फ्री रॅडिकल्सपासून मुक्त राहते

आईस टीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम असते जे शरीरातून फ्री रॅडिकल्सला बाहेर टाकते. हे फ्री रॅडिकल्स तुमच्या शरीरात तणाव निर्माण करण्याचं कारण ठरतात.

वजन कमी

आईस टीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.  

किती प्रमाणात प्यावी?

आईस टी पिण्याचा उत्तम मार्ग म्हणजे साखरेशिवाय आईस टी पिणे. दिवसातून फक्त एकदा आणि आठवड्यातून काही कप आईस टी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणताही धोका होत नाही.

मधुमेहावर नियंत्रण

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांसाठी आईस टी फायदेशीर आहे कारण आईस टीमध्ये साखरेची पातळी कमी असते. सोबतच शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

आरोग्य

आईस टीमध्ये नैसर्गिक साखरही कमी असते. आईस टीमुळे टाईप-२ च्या मधुमेहाचा धोका कमी होऊन तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

सुक्या मेव्याचा हलवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा