व्यायामासाठी वेळ नसेल तर ‘या’ गोष्टी फॉलो करा, तंदुरुस्त राहाल

सकाळ ऑनलाईन

कधीही भुकेपेक्षा कमीच जेवावं पण सात्विक आहार घ्यावा

बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं, वेळ आलीच तरी साधा हलका फुलका आहार घ्यावा

प्रवासात शक्यतो सहज पचेल असं व्हेजच खावं, नॉनव्हेजमुळं पचनक्रियेत अडथळा होऊन त्रास होऊ शकतो 

दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.

दुपारच्या जेवणाबरोबर ताक, काकडी, गाजर असं सॅलड खावं

त्याचबरोबर भूक लागल्यास जवळ काहीही खाद्यपदार्थ उपलब्ध नसेल तर सफरचंद, अंजीर, पेरु, अशी फळं खावीत. सिझनल फळं खाल्यानं जीवनसत्वांची कमतरता भासत नाही.

सोडा, कोल्डड्रिंक्स, दारू, सागारेट ही व्यसनं टाळावीत. यामुळं तुमची फुफ्फुसं आणि लिव्हर चांगलं राहिलं.   

दररोज काही मिनिटं पायी चाला तसंच विपश्यना करा

पूर्ण आणि वेळेवर झोप घ्या. कमीत कमी ८ तासांची झोप तुम्हाला ताजतवानं करते आणि तुमचा संपूर्ण दिवस छान जातो.