पुजा बोनकिले
दूध हे खरे तर पूर्णान्न आहे.
भारतीय आहारात दूध हे कॅल्शिअम देणारे प्रमुख स्रोत आहे; परंतु काही जणांना दूध पचत नाही किंवा मुळातच आवडत नाही.
अशा लोकांनी कॅल्शियमसाठी अन्य आहारीय पर्यायांचा आहारात समावेश करणे आवश्यक असते.
कारण कॅल्शिअम हे हाडांसाठीच नव्हे, तर हृदय व स्नायूंच्या आरोग्यासाठीदेखील आवश्यक असते.
दूध घेत नसल्यास दही, ताक, चीज, पनीर हे अधिक घ्यावे.
दह्यात लॅक्टिक ऍसिड असल्याने ते पचायला दुधापेक्षा हलके असते.
तुम्ही आहारात दही, ताक, राजगिरा, चवळी, हरभरा, नाचणी व पालेभाज्या यांची योजना करावी.
वाढत्या वयाची मुले, कृश व्यक्ती, नियमित व्यायाम करणाऱ्यांसाठी दुधाला पर्यायी पदार्थ म्हणजे - चीज, पनीर, बदाम, तीळ, हळीव, सोयाबीन, सुके खोबरे व सुकी मासळी.
दूध घेणे परवडत नसल्यास आपल्या रोजच्या आहारात वाटीभर पालेभाजी घ्यावी. पालेभाजी ही कॅल्शिअम व लोहाचे चांगले स्रोत आहे.