हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा या भाज्या...

Aishwarya Musale

हिवाळ्यात तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याची खूप काळजी घ्यावी लागेल. अशात तुम्ही काही भाज्यांचं सेवन केलं पाहिजे.

ज्यांच्या मदतीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येईल. चला जाणून घेऊ अशा भाज्यांबाबत...

बटाटा

बटाट्याचं सेवन हिवाळ्यात नक्की करायला हवं. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी असतात. हे गुण अँटी-ऑक्सिडेंटच्या रूपात काम करतात. त्यामुळे बटाटे हिवाळ्यात आवर्जून खावेत.

कांदा

कांदाही आपल्या डाएटमध्ये ठेवावा. यात फायबर असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. तसेच यातील केरसोटिनने गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत मिळते.

लसूण

हिवाळ्यात लसणाचंही सेवन करायला हवं. यात सल्फरचं प्रमाण अधिक असतं. याने ग्लूटाथियोनची लेव्हल वाढण्यास मदत मिळते. याने स्ट्रेस कमी करण्यास देखील मदत मिळते.

मूळा

मूळा पोटासाठी फार फायदेशीर मानला जातो. यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. याने हाडेही मजबूत होतात.

बीट

हिवाळ्यात बिटाचं सेवनही केलं पाहिजे. यात बीटा केरोटीन असतं. जे डोळ्यांसाठी फार महत्वाचं असतं.

गाजर

गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि अँटी टॉक्सिन गुण असतात जे आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतात. यात बायोटीन गुणही असतात जे केसांची वाढ चांगली करतात.

आयुर्वेदानुसार दही खाण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ, जाणून घ्या

येथे क्लिक करा