Sandip Kapde
मोबाईलमुळे अनेक दुष्परिणाम होत असल्याचे आपण पाहतो.
तुम्हाला मोबाईलची रिंग वाजल्याचा भास होतो का? मोबाईलवर नोटिफिकेशन आलं असं वाटत आणि आपण मोबाईल चेक करतो. मात्र कॉल किंवा नोटीफिकेशन आलेलं नसतं? असं का होत आहे. हा गंभीर आजार तर नाही ना?
तुम्हालाही फोन वाजल्याशिवाय मोबाईलची रिंग किंवा व्हायब्रेशन जाणवते का - तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का की तुम्ही कुटुंबीयांशी किंवा मित्रांसोबत बसून बोलत आहात आणि तुमचा फोन तुमच्या खिशात आहे?
फोन व्हायब्रेट होतो आणि जेव्हा आपण बाहेर काढतो तेव्हा एकही संदेश किंवा कॉल नसतो. अचानक असे वाटणे 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' हा गांभीर मानसिक आजार असू शकतो.
बऱ्याच लोकांना मॅसेज आणि कॉलची रिंगटोन ऐकू येते आणि ते मोबाईल बघत असतात. बिघडलेल्या दिनचर्येमुळे हा आजार वाढताना दिसत आहे.
मोबाईल काळाची गरज बनली आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना मोबाईल हवा असतो.
शिक्षणापासून ते मनोरंजानापर्यंत अनेक गोष्टीसाठी मोबाईलचा वापर होतो. मात्र यामुळे फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम हा आजार होत आहे.
१०० मोबाईलधारकांपैकी ११ जण या गंभीर आजाराने हैराण आहेत. २० ते ३० वयोगटातील लोकांना याचा धोका जास्त आहे.
४० वर्षे वयोगटातील लोकांचा देखील यात समावेश आहे. व्हॉट्सअप, इन्टाग्रामसारखे मेसेजिंग अॅपवर वेळ घालवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.
तुम्हाही ही लक्षणे दिसत असतील तर त्वरित सावध व्हा. यावर उपाय काय आहेत बघूया.
फोनचा वापर कमी करा, स्क्रीन टाईम सेट करा, फोनचं नोटीफिकेशन बंद करा आणि रिंगटोन बदला. मित्रांसोबत गप्पांसाठी वेळ द्या. पुस्तक वाचणासाठी देखील वेळ काढा.
खूप तीव्र लक्षणं असतील तर मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.