Aishwarya Musale
जर तुमचे हात आणि पाय टॅन झाले असतील तर काही घरगुती उपाय आहेत.
ज्याच्या मदतीने तुम्ही टॅन सहजपणे दूर करू शकता, यासाठी तुम्हाला काही फेस मास्क घरीच बनवावे लागतील.
पायांवरचा टॅन दूर करण्यासाठी लिंबू आणि साखर सर्वोत्तम उपाय आहेत. साखर मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करते. लिंबूमध्ये असलेले अॅसिडिक तत्व त्वचेतील मेलेनिन कमी करण्याचे काम करते.
अर्धा बटाटा किसून त्याचा रस काढा आणि त्यात लिंबू पिळून घ्या. आता हा तयार रस 15 ते 20 मिनिटे पायावर ठेवल्यानंतर तो धुवा. यानंतर तुमच्या पायावर जी चमक येईल ती तुम्हाला आश्चर्यचकीत करेल.
ओट्स बारीक करून त्यात दही मिसळा आणि पेस्ट तयार करा. त्यात तुम्ही लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता. या पेस्टने पायाला स्क्रब करा आणि 15 मिनिटे पायावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
एका भांड्यात एक मोठा चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात एक चमचा मध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्हाला अर्धा तास पायांवर ठेवावी लागेल.
गरजेनुसार पपईची पेस्ट घ्या, त्यात अर्धा चमचा मध मिसळून टॅन झालेल्या पायावर लावा. 20 ते 25 मिनिटांनी धुतल्यानंतर तुम्हाला पायातील टॅनिंग निघून गेलेली दिसेल.
पायांचा टॅन झटपट काढण्यासाठी हळद वापरणे चांगले.