Indian Armed Forces: तुम्हालाही सैन्य दलात अधिकारी व्हायचंय, तर हे वाचाचं..

सकाळ डिजिटल टीम

AFCAT

भारतीय वायुसेनेत जाण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही परिक्षा महत्वाची आहे. ही परीक्षा तांत्रिक, अतांत्रिक आणि लॉजिस्टिक्स या विभागांसाठी घेतली जाते. भारतातील सर्वात सोपी परीक्षा म्हणून एफकॅटला ओळखले जाते.

Indian Air Force | Esakal

एनडीए परीक्षा

भारतीय सेनेमध्ये अधिकारी होण्यासाठी एनडीए परीक्षा महत्वाची असते. १२वीला भौतिकशास्त्र आणि गणित विषय घेऊन उत्तीर्ण होणारे विद्यार्थी या परीक्षेस पात्र आहेत. या परीक्षेसाठी १७.५ ते १९.५ अशी वयोमर्यादा आहे. भारतीय सेनांचे प्रमुखपद भुषवणारे अधिकारी हे एनडीएमधून उत्तीर्ण झालेले आहेत.ही यूपीएससीमार्फत परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.

National Defence Academy | Esakal

यूपीएससी सीडीएस (UPSC CDS)

यूपीएससी सीडीएस ही देखील परीक्षा एनडीए परीक्षेप्रमाणेच वर्षातून दोनदा घेतली जाते. यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असावी.

indian military Academy | Esakal

यूपीएससी सीडीएस परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर इंडियन मिलिटरी अ‍कॅडमी, देहराडून येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. वयोमर्यादा १८-२४

Indian Army | Esakal

INET

आयनेट ही परीक्षा भारतीय नौदलात जाऊ ईच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतली जाते. ही परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही विभागाची अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

indian navy | Esakal

UPSC CAPF

ही परीक्षा यूपीएससीमार्फत वर्षातून एकदा घेतली जाते. त्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली असावी. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला BSF, CRPF, ITBP,SSB आणि CISF सारख्या केंद्रीय सशस्त्र दलामध्ये सेवा करण्याची संधी मिळू शकते.

CRPF | Esakal