नवीन वर्षात निरोगी राहायचंय? मग नक्की करा 'या' चाचण्या

Aishwarya Musale

रोगप्रतिकारशक्ती

कोणत्याही व्यक्तीचे वय जसजसे वाढत जाते, तसतशी त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणे म्हणजे तो केव्हाही लहान-मोठ्या आजारांना बळी पडू शकतात.

आरोग्य

त्यामुळे खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. मग प्रश्न असा पडतो की स्त्री किंवा पुरुष जसजसे मोठे होतात, म्हणजे जेव्हा आपण वयाचे 30, 40 किंवा 50 वर्ष ओलांडतो, तेव्हा आपण कोणत्या आवश्यक चाचण्या कराव्यात?

डायबिटीज

हा सामान्य आजार नाही. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याचा हा परिणाम आहे. आजच्या काळात 1/4 लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनशैलीत विशेष सुधारणा केली तर तो मधुमेह टाळू शकतो.

कर्करोग

20 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुषांना बर्याचदा कर्करोग होतो. हा आजार वेळीच ओळखला तर तो सहज बरा होऊ शकतो. तसेच त्याचे सामान्य लक्षण सौम्य वेदना आहे. अशावेळी तुम्ही टेस्ट करू शकता जेणेकरून जर तुम्हाला थोडीशी वेदना होत असेल तर तुम्ही ते तपासू शकता.

थायरॉईड चाचणी

थायरॉईड हळूहळू शरीरप्रणालीवर परिणाम करतो. वयाच्या 40 व्या वर्षी डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉईडची चाचणी करून घेणे आवश्यक आहे.

डोळ्यांची तपासणी

जर तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स घालत असाल तर दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घ्या.

गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगाची तपासणी

गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी पॅप स्मीयर चाचणी केली जाते. वयाच्या चाळीशीनंतर ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच, नियमित स्तन तपासणी करण्यास विसरू नका.

न्यू इयरच्या पार्टीचा हँगओव्हर कसा घालवणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा