Aishwarya Musale
जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल आणि तुम्हालाही पाऊस आवडत असेल तर निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटण्यासाठी पावसाळी सहल काढली पाहिजे.
बहुतांश लोकांना थंडी किंवा उन्हाळ्याऐवजी पावसाळ्यात प्रवास करायला आवडतो. अशा ऋतूत ते जंगलात किंवा डोंगरांवर, हिल स्टेशनलाही फिरायला जातात.
पावसाळ्यात सुरक्षित आणि आनंदाने प्रवास करण्यासाठी काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी.
पावसाळ्याच्या दिवसात असे कपडे वापरा आणि बॅगेत ठेवा जे सहज वाळवता येतील. यासाठी हलके वजनाचे रेन जॅकेट, नायलॉन, पॉलिस्टर ड्रेस सोबत ठेवा.
पावसात कापड किंवा चामड्याच्या शूजऐवजी वॉटरप्रूफ चपला वापराव्यात. तसेच ज्यांची पकड किंवा ग्रीप चांगली असेल, सहज घसरणार नाहीत, अशाच चपलांचा वापर करावा.
कॅमेरा, बॅग आणि इतर इलेक्ट्रिक वस्तू झाकण्यासाठी, वॉटरप्रूफ कव्हर नक्की पॅक करा. तुम्ही तुमचा फोन, चार्जर या गोष्टी पाऊचमध्ये ठेवा, ज्यामध्ये पाणी जाणार नाही.
प्रवासादरम्यान तुम्ही कोणत्याही ढाब्यावर खात असाल तर प्यायला नेहमी घरातील पाणी सोबत ठेवा. या ऋतूत बाहेरचे पाणी पिणे टाळावे, अन्यथा जुलाब होऊ शकतात.
तुमच्या बॅगमध्ये नेहमी छोटी छत्री ठेवा. ती तुम्हाला भिजण्यापासून वाचवू शकते. एवढेच नाही तर त्यामुळे तुम्ही पावसात कुठेही अडकून पडणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.