Anuradha Vipat
इला अरुणच्या आवाजात गायलेले ‘चोली के पीछे’ हे मूळ गाणे बॉलीवूडमधील आयकॉनिक गाण्यांपैकी एक आहे.
या गाण्याची मूळ गायिका इला अरुण हिने एका मुलाखतीत सांगितले की, या गाण्याबाबत माझ्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती.
तसेच या गाण्याच्या नवीन व्हर्जनबाबतही माहिती मिळालेली नाही असंही ती म्हणाली.
हे गाणे अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायले होते आणि आता ‘क्रू’ चित्रपटातही त्यांचा आवाज वापरण्यात आला आहे. या गाण्याला मध्यभागी दिलजीत आणि आयपी सिंग यांचा आवाजही आहे.
इला म्हणाली की, हे गाणे प्रदर्शित होण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे तिला सांगण्यात आले होते. या गाण्याच्या म्युझिक कंपनीसोबत तिचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे, म्हणूनच जर तिला आधीही याविषयी सांगितलं असतं, तर ती नाकारू शकली नसती.
पण असे गाणे रिक्रिएट होत असेल, तर त्यात मूळ कलाकारालाही काम मिळायला हवे आणि नफ्यातील काही हिस्सा त्यांनाही मिळायला हवा, असे ती म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.