Saisimran Ghashi
अनेकांना रात्री उशिरा काम किंवा अभ्यासामुळे जेवण वेळेवर करता येत नाही आणि ते उपाशीच झोपतात.
पण तुम्हाला माहित आहे का, रात्री उपाशी पोटी झोपणं तुमच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकतं.
झोपेसाठी शरीरास ऊर्जेची आवश्यकता असते. उपाशी झोपल्याने सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो आणि दिवसभरासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळण्यास अडचण येऊ शकते.
उपाशी झोपल्याने चयापचय मंदावतो, ज्यामुळे वजन कमी होण्याचा धोका वाढतो.
रात्री उपाशी झोपल्याने पोटदुखी, अपचन आणि गॅस सारख्या पचन समस्या उद्भवू शकतात.
झोपेच्या वेळी शरीर ऊतींची दुरुस्ती आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. उपाशी झोपल्यास या प्रक्रियेत अडथळा येतो.
सकाळी उपाशी राहिल्याने एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
रात्री उपाशी झोपल्याने निद्रानाश आणि लवकर जागे होणे यासारख्या झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.
उपाशी झोपल्याने चिडचिडेपणा, थकवा आणि नकारात्मक विचारांमध्ये वाढ होऊ शकते.
सतत उपाशी झोपण्याची सवय असल्यास हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
रात्रीचे जेवण हा दिवसभरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. संतुलित आणि निरोगी जीवन जगण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी हलके अन्न खाणं आवश्यक आहे.