Amit Ujagare (अमित उजागरे)
जुनाट आजारातून बाहेर पडण्यासाठी उपवास हे एक महत्वाचं साधन ठरु शकतं, असं डॉ. मृण्मयी मांगले यांनी म्हटलंय. ज्या एमबीबीएस, क्रोनिक डिसिज रिव्हर्सल एक्सपर्ट आहेत.
अॅलोपॅथीचे जनक हिपॉक्रेट्स यांनी आजारी असताना खाणं म्हणजे आजाराला खाऊ घालणं असं उपवासाबद्दल म्हटलं होतं.
२०१६ मध्ये जपानचे संशोधक डॉ. योशिनोरी ओसुमि यांनी autophagy या पेशींच्या पातळीवर होणारे परिणाम सिद्ध करत जगासमोर उपवासाचे फायदे आणले होते. यासाठी त्यांना नोबेल मिळाला होता.
Autophagy हा शब्द ग्रीक शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ स्वतःला खाऊन टाकणे असा आहे. म्हणजेच ज्या पेशींपासून पुढे कॅन्सर होणार आहे, ज्या पेशींमध्ये अतिरिक्त सूज आहे अशा पेशी मरण पावतात.
आपण उपवास करतो तेव्हा पचन क्रियेत रुपांतरीत होणारी जीवन ऊर्जा शरिरातील आम्ल पदार्थ, आजारी पेशी, Chronic Inflammation याला दुरुस्त करते.
पण आपण आता अन्नाचं अतिसेवन करु लागल्यानं आजारी, कमकुवत पेशींना जिवंत राहण्यासाठी सपोर्ट मिळतो.
उपवास ही संकल्पना आपल्यासाठी नवी नाही. आपले आजी-आजोबा आजही एकादशी, श्रावणी सोमवार असे उपवास वर्षभर करत असतात. हे उपवास कडक स्वरुपाचे असतात त्यामुळं ते आरोग्यासाठी लाभदायक असायचे.
पण हल्ली आपण उपवास हा फराळ खाऊन करत असतो, सहाजिक तो उपयोगाचा नाही.