Vrushal Karmarkar
अडीच हजार वर्षांपूर्वी "कौटिलीय अर्थशास्त्र" या ग्रंथात कौटिल्याने विषारी धूर तयार करून शत्रूला मारण्याची हत्यारे तयार केल्याचे संदर्भ आहेत.
दारुगोळा बनवण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट किंवा साल्टपेत्र किंवा नत्र हे रसायन वापरल्याचे संदर्भ या ग्रंखात लिहिले आहेत.
नत्र हे खनिज प्रकारात मोडते आणि बंगाल आणि बिहार मध्ये याचे मुबलक साठे होते. नत्राचे ज्वलनशील गुणधर्म संपूर्ण जगास ज्ञात करून देण्याचे श्रेय युरोपिअन लोकांना जाते.
युरोपिअन लोकांनी भारतीय लोकांकडून गन पावडर कशी करायची ते शिकून घेतले. त्याचा वापर स्वतःचे साम्राज्य जगभर वाढविण्यासाठी केला.
१३६८ मध्ये मुहम्मद बहामनी पहिला याने विजयनगर साम्राज्याकडून ३०० तोफा हस्तगत केल्या होत्या. दक्षिणेकडील सर्व हिंदू राज्ये तोफखाना बाळगत असत.
भारतामध्ये फार पूर्वीपासून तोफेसाठी लागणारी दारू हि "लुणिया" किंवा "नुनिया" ही जमात बनवत असे. दारूसाठी ३ संयुगे वापरली जात होती.
नत्र, कोळसा , गंधक हे सर्व बिहार आणि बंगाल मध्ये विपुल प्रमाणात सापडतात. ब्रिटिश, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे या तोफांचा व्यापार भारतभर करीत असत.
भारताचे प्लॅन मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते?