Dengue Recovery Diet : डेंग्यूपासून लवकर बरं व्हायचंय? मग, 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा

सकाळ डिजिटल टीम

डेंग्यूचे रुग्ण

Dengue Recovery Diet : पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागतात. डेंग्यूमुळे शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात, त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ शकते.

Dengue Recovery Diet

औषधांसोबतच खाण्याच्या योग्य सवयी

डेंग्यूच्या उपचारादरम्यान औषधांसोबतच खाण्याच्या योग्य सवयीही खूप महत्त्वाच्या असतात.

Dengue Recovery Diet

ताप दूर करण्यासाठी किवी उपयुक्त

ताप दूर करण्यासाठी किवी खूप उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.

Dengue Recovery Diet

पपईच्या पानांचा रस

पपईच्या पानांचा रस प्यायल्याने प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते. हा रस प्लेटलेट्स वाढवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि डेंग्यूपासून लवकर बरा होण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे

Dengue Recovery Diet

पपई

पपईमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. डेंग्यूच्या संसर्गामुळे होणाऱ्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठीही पपई फायदेशीर आहे.

Dengue Recovery Diet

केळी

केळीमध्ये व्हिटॅमिन-बी 6, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डेंग्यूपासून लवकर आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. पिकलेली केळी सहज पचते आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असते.

Dengue Recovery Diet

पालक

पालक भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के आढळते. व्हिटॅमिन ए आणि सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, तर व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करतात. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांनी आहारात पालकाचा समावेश जरूर करावा.

Dengue Recovery Diet

नारळाचे पाणी

जुलाब आणि उलट्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता दूर होण्यास नारळ पाणी मदत करते. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांना नारळपाणी पिण्याचा खूप फायदा होतो.

टीम : दिलेल्या माहितीचं अनुसरण करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dengue Recovery Diet

Skin Care Tips : फक्त 5 रुपयांत डोक्यापासून पायापर्यंत खुलवा आपलं सौंदर्य; 'हे' आहेत 3 घरगुती रामबाण उपाय

Monsoon Skin Care Tips | esakal
येथे क्लिक करा