राहुल शेळके
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात सर्वात जास्त चर्चा ही कर रचनेची होते.
करात सवलत देऊन सरकार आपला भार हलका करेल, अशी लोकांना आशा असते.
मात्र, जगात असे अनेक देश आहेत जिथे सरकार लोकांकडून आयकर म्हणून एक रुपयाही वसूल करत नाही.
तरीही त्यांची अर्थव्यवस्था चालू आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 देशांबद्दल सांगणार आहोत.
या देशाने वैयक्तिक कराची अंमलबजावणी केलेली नाही. सरकार पूर्णपणे अप्रत्यक्ष कर जसे की VAT वर अवलंबून आहे. तेल आणि पर्यटनामुळे यूएईची अर्थव्यवस्था मजबूत आहे.
बहरीनचे सरकारही आपल्या लोकांकडून आयकर वसूल करत नाही. इथेही दुबईसारखीच व्यवस्था आहे. सरकार अप्रत्यक्ष करातून आपला खर्च भागवते. या प्रणालीमुळे बहारीनमध्ये छोटे व्यवसाय आणि स्टार्टअप्स वेगाने वाढत आहेत.
कुवेत हा देखील करमुक्त देश आहे. येथे आयकर नाही. कुवेतची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारला जनतेकडून कर वसूल करण्याची गरज नाही.
सौदी अरेबियानेही देशातील लोकांना आयकर आणि प्रत्यक्ष करातून सूट दिली आहे. अप्रत्यक्ष कर प्रणालीमुळे देशाची अर्थव्यवस्था चांगल्या गतीने चालत आहे.
बहामासची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. हा देश आपल्या लोकांकडून आयकर वसूल करत नाही. दरवर्षी जगभरातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात.
या इस्लामी देशात तेलाचे अफाट साठे आहेत. येथील सरकार जनतेकडून आयकर वसूल करणे आवश्यक मानत नाही.
ओमानही आपल्या नागरिकांकडून कर वसूल करत नाही. ते तेल आणि वायू विकून आपली अर्थव्यवस्था भक्कमपणे चालवत आहेत.
आपल्या शेजारील आखाती देशांप्रमाणे कतारही तेल उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे येथेही जनतेकडून आयकर वसूल केला जात नाही. हा देश छोटा असूनही खूप श्रीमंत आहे.
हा युरोपमध्ये स्थित एक छोटासा देश आहे. या देशाला पर्यटनातून पैसा मिळतो.