सकाळ डिजिटल टीम
२२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ऋषभ पंत आज ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला.
या महत्वाच्या दौऱ्यावर जाताना त्याने आईचा आशिर्वाद घेतला.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने उल्लेखनीय कामगिरी केली.
यालिकेत त्याने ३ अर्धशतके लगावली, ज्यामध्ये त्याचे एक शतक एका धावेने हुकले होते.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारताला ३-० ने पराभव पत्कारावा लागला.
WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका निर्णायक ठरणार आहे.
WTC स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४ सामने जिंकण्याची गरज आहे.
५ सामन्यांची ही मालिका होणार आहे.
२२ नोव्हेंबरपासून मालिकेतील पहिल्या सामन्याला पर्थ येथे सुरूवात होणार आहे.