सकाळ डिजिटल टीम
न्यूझीलंडने पुण्यातील भारताविरूद्धचा दुसरा कसोटी सामना ११३ धावांनी जिंकला.
बंगळूरू येथे झालेली पहिली कसोटी व पुण्यातील दुसरी कसोटी जिंकून न्यूझीलंडने कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिकेत मायदेशात पराभूत झाला आहे.
पुण्यातील सामन्यातील न्यूझीलंडच्या विजयात फिरकीपटू मिचेल सँटनरने १३ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.
सँटनरने १३ विकेट्स घेत मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने केलेले विक्रम जाणून घेऊयात.
सँटेनरने पुण्यात पहिल्या डावात ७ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स अशा मिळून १५७ धावा खर्च करत १३ विकेट्स घेतल्या.
भारताविरूद्ध एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा मिचेल सँटनर न्यूझीलंडचा पहिला फिरकीपटू ठरला आहे.
१४ - अजाज पटेल (२०२१)
१३ - मिचेल सँटनर (२०२४)
१३ - इयान बोथम ( १९८०)
१४/२२५ - अजाज पटेल (मुंबई, २०२१)
१३/१५७ - मिचेल सँटनर (पुणे, २०२४)
११/५८ - रिर्चड हॅडली (वेलिंग्टन, १९७६)
१०/८८ - रिर्चड हॅडली (मुंबई, १९८८)