Pranali Kodre
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवस अखेरपर्यंत (२ नोव्हेंबर) आर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे आता अश्विनच्या वानखेडे स्टेडियमवर ६ सामन्यांत ४१ कसोटी विकेट्स झाल्या आहेत. तो या मैदानात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
अश्विनने याबाबतीत अनिल कुंबळेच्या विक्रमाला मागे टाकले आहे. कुंबळेने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ७ सामन्यांत ३८ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच अश्विनने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक कसोटी विकेट्स वानखेडे स्टेडियमवरच घेतले आहेत.
त्याने वानखेडे पाठोपाठ त्याचं घरचं मैदान असलेल्या एमए चिदंबरम स्टेडियम या चेन्नईतील स्टेडियमवर घेतल्या आहेत. या मैदानात त्याने ५ सामन्यांत ३६ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
त्यानंतर त्याने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम या दोन ठिकाणी प्रत्येकी ५ सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनने नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ४ सामन्यांत ३१ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अश्विनने ६ सामन्यांत ३० कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.