Swadesh Ghanekar
ऋषभ १०५ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ९९ धावांवर बाद झाला. पण, कसोटीत एका धावेने शतक हुकलेला तो भरताचा नववा फलंदाज आहे.
२०१४ मध्ये एडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुरली विजय ९९ धावांवर बाद झाला होता.
नागपूर कसोटीत २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध महेंद्रसिंग धोनीला १ धावेने शतकाने हुकलावणी दिली होती
२०१०मध्ये वीरेंद्र सेहवाग कोलंबो कसोटीत श्रीलंकेविरुद्ध ९९ धावांवर बाद झाला होता.
माजी कर्णधार सौरव गांगुली २ वेळा ( वि. इंग्लंड, २००२ व वि. श्रीलंका, १९९७) ९९ धावांवर बाद झाला होता.
१९९४ मध्ये बंगळुरू कसोटीत नवज्योत सिंग सिद्धू ९९ वर बाद झाला होता.
१९६८ साली ऑकलंड कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध ऋषी सु्र्ती शतकापासून १ धावेने वंचित राहिले होते.
मेलबर्न कसोटीत १९६७ साली अजित वाडेकर दुर्दैवी ठरले होते
पाकिस्तानविरुद्ध १९६०च्या कानपूर कसोटीत मोतगन्हाल्ली जयसिम्हा ९९वर आऊट झाले होते
भारताकडून कसोटीत पहिल्यांदा ९९ धावांवर बाद होणारे पंकज रॉय ( वि. ऑस्ट्रेलिया) हे पहिले होते.