सकाळ डिजिटल टीम
भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील अंतिम सामना १३५ धावांनी जिंकला.
ही मालिका भारताने ३-१ ने आपल्या नावे केली. ज्यामध्ये तिलक वर्मा व संजू सॅमसनने प्रत्येकी २-२ शतके ठोकली.
मालिकेत एकूण २८० धावा करणारा तिलक वर्मा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
सुरूवातीच्या दोन सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर तिलक वर्मा पुढच्या दोन सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला आणि शेवटच्या दोन्ही सामन्यात शतके ठोकली.
आफ्रिकेविरूद्ध पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ३ षटकार व २ चौकार ठोकले.
दुसऱ्या सामन्यात तिलक अवघ्या २० चेंडूत २० धावा करू शकला.
तिसऱ्या सामन्यात तिलक वर्माने ५६ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह १०७ धावा करत शतक ठोकले व तो या सामन्यात सामनावीर ठरला.
अंतिम सामन्यातही तिलक वर्माने ९ चौकार व १० षटकारांच्या मदतीने १२० धावांची शतकी खेळी केली व सामन्यातही त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला.