Pranali Kodre
डर्बनमधील किंग्समेड मैदानात ८ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिकेतील पहिला सामना झाला.
या सामन्यात भारताने ६१ धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात संजू सॅमनने मोलाचे योगदान दिले.
संजू सॅमसनने ५० चेंडूत ७ चौकार १० षटकारांसह १०७ धावांची खेळी केली.
संजू सॅमसनच्या खेळाच्या जोरावर भारताला २० षटकात ८ बाद २०२ धावा करता आल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ १४१ धावांवरच सर्वबाद झाला.
सॅमसनने या सामन्यात शतकी खेळी करताना आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये एकाच डावात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या रोहितच्या विक्रमाशी बरोबरी केली.
रोहित शर्माने २२ डिसेंबर २०१७ रोजी इंदूरला श्रीलंकेविरुद्ध ११८ धावांची खेळी करताना १० षटकार ठोकले होते.
तसेच सॅमसनने सलग दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचाही विक्रम केला आहे.
त्याने ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात हैदराबादमध्ये १११ धावांची शतकी खेळी केली होती.