यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय?

Monika Lonkar –Kumbhar

स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.

७८ वा स्वातंत्र्यदिन

यंदा भारत देश ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.

थीम

दरवर्षी स्वातंत्र्यदिनाची एक थीम ठरवली जाते. त्या थीमवर आधारित स्वातंत्र्यदिनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाची थीम काय?

या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ही ‘विकसित भारत’ अशी असणार आहे. 

याच थीमवर आधारित स्वातंत्र्यदिनाचा उत्सव देशभरात साजरा केला जाणार आहे.  

विकसित भारत

स्वातंत्र्याची १०० वर्षे २०४७ मध्ये पूर्ण होत असताना, भारताला विकसित देश बनवणे, हे त्या थीम मागील ध्येय आहे.

१५ ऑगस्ट

स्वातंत्र्यदिन अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सध्या सर्वत्र स्वातंत्र्यदिनाची लगबग पाहायला मिळतेय.

निरोगी अन् अ‍ॅक्टिव्ह मेंदूसाठी प्या फळांचे ज्यूस

येथे क्लिक करा.