Monika Lonkar –Kumbhar
यंदा भारत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ही 'विकसित भारत' अशी आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.
यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाला नरेंद्र मोदींनी खास लूक केल्याचे दिसून आले.
मोदींनी यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि निळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट परिधान केले होते.
यंदा मोदींनी डोक्यावर राजस्थानमधील लहरिया प्रिंटचा नारंगी आणि हिरव्या रंगाचा फेटा घातला होता.
मोदींनी आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला वेगळा फेटा आणि पोशाख परिधान केल्याचे दिसून आले.