शुभमंगल! ९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अष्टपैलू क्रिकेटरने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

Pranali Kodre

शुभमंगल

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक हुड्डा लग्नबंधनात अडकला आहे.

Deepak Hooda Marriage | Instagram

गर्लफ्रेंडबरोबर लग्न

दीपकने 15 जुलै रोजी त्याची दीर्घकाळच्या गर्लफ्रेंडबरोबर लग्न केले आहे.

Deepak Hooda Marriage | Instagram

फोटो

आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या दीपकने १९ जुलैला त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Deepak Hooda Marriage | Instagram

हिमाचली मुलगी

मात्र, त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याच्या पत्नीचे नाव उघड केलेलं नाही, पण ती हिमाचल प्रदेशची असल्याचं त्यानं कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.

Deepak Hooda Marriage | Instagram

९ वर्षांची प्रतिक्षा

त्याने कॅप्शनमध्ये असंही सांगितलंय की ९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर ते लग्नबंधनात अडकले आहेत.

Deepak Hooda Marriage | Instagram

"लिटील-पिटील हिमाचली मुलगी"

याशिवाय दीपकने असंही म्हटलंय 'माझी लिटील-पिटील हिमाचली मुलगी, तुझं घरी स्वागत आहे.'

Deepak Hooda Marriage | Instagram

लूक

दीपकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या पत्नीने सुंदर लाल रंगाचा लेहंगा घातलेला दिसत आहे. तसेच त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

Deepak Hooda Marriage | Instagram

फेस इमोजी पिवळ्या रंगाच्याच का असतात?

Why emojis mostly yellow? | Sakal
येथे क्लिक करा