सकाळ डिजिटल टीम
घरची हलाखीची परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळं भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये (इस्रो) वरिष्ठ शास्त्रज्ञ पदावर असणाऱ्या आडी (ता. निपाणी) या सीमाभागातील गावचे केरबा आनंदराव लोहार या मराठी तरुणाचा चंद्रयान-3 मोहिमेला हातभार लागला आहे.
नुकतीच भारताची चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली आहे. केरबा लोहार यांच्या कामगिरीबद्दल सीमाभागासोबत संपूर्ण देशातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सीमाभागातील आडी हे केरबा लोहार यांचं मूळ गाव. त्यांचं प्राथमिक शिक्षण आडी येथील सरकारी शाळेत आणि माध्यमिक शिक्षण सौंदलगा इथं झालं.
बेळगावच्या शासकीय पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. याचवेळी इस्रोच्या मुख्य कार्यालयातील तांत्रिक सल्लागार या पदासाठी त्यांनी परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर ते १९९४ पासून या पदावर रुजू झाले.
परंतु, अवकाश संशोधनाची आवड निर्माण झालेल्या केरबा यांनी बंगळुरू येथील बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एमईचं शिक्षण पूर्ण केलं. नोकरीत असूनही शिक्षणाची, तसेच कामावरची श्रद्धा आणि मेहनत पाहून त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून पदोन्नती मिळत गेली.
यापूर्वी २०१९ मध्ये चंद्रयान-२ या मोहिमेतही त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं प्रत्यक्ष अभिनंदन केलं होतं.
यापूर्वीही त्यांनी चंद्रयान-१, मंगळयान, जीएसएलव्ही यासारख्या विविध मोहिमांसाठी काम केलं आहे. चंद्रयान मोहिमेतील उपग्रहामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांची मुख्य भूमिका असते. या तिन्ही भागांसाठी लागणारे डिझाईन करणाऱ्या टीममध्ये केरबा लोहार यांचा सिंहाचा वाटा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.